Sunday, March 15, 2009

Subscribe Palghar Mitra on Email

To subscribe Palghar Mitra on your personal email please write us on: palgharmitra-subscribe@yahoogroups.com

Saturday, March 14, 2009

सुस्वागतम्!!!!!

"ब्लॉग" म्हणजे तरी काय?"
ब्लॉग" (Blog) हे "वेबलॉग" (Weblog) या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप आहे. ब्लॉग किंवा वेबलॉग म्हणजे इंटरनेटवर नियमितपणे लिहिल्या जाणारी अव्यक्तिगत रोजनिशी. ह्याला मराठीतून "नोंदस्थळ" हा प्रतिशब्द वापरता येतो. ब्लॉग किंवा नोंदस्थळातील लेखांना "पोस्ट" (Post) किंवा "नोंद" म्हटले जाते आणि ती उतरत्या
कालक्रमानुसार नोंदस्थळावर दाखविली जाते. ही रोजनिशी इंटरनेट किंवा आंतरजालावरील वाचकही वाचू शकतात आणि त्यावर आपला प्रतिसाद व्यक्त करू शकतात.
ब्लॉग का बरे लिहावा?
ब्लॉग सुरु करण्याची बरीच व्यक्तिगत कारणे असू शकतात. जर तुम्ही व्यवसायी लेखक किंवा कवी नसाल आणि चाकोरीबद्ध कागदी पुस्तके प्रकाशित करण्याची खटपट करायची नसेल किंवा वृत्तपत्रातील पत्रकार ह्या व्यवसायात नसाल आणि तरीही तुम्हाला तुमचे लेख, कविता, विचार इंटरनेटवरील वाचकांना वाचण्याकरिता प्रसिद्ध करावयाचे असतील तर "ब्लॉग" सारखे दुसरे सोपे माध्यम नाही. लेख प्रसिद्ध केल्यावर लगेच वाचक प्रतिसाद पाठवू शकतात. तुमच्या लेखांबद्दल कोणताही प्रतिसाद एवढ्या लवकर मिळणे दुसऱ्या माध्यमांतून तरी अशक्य आहे.जरीही रोजनिशीपासून "ब्लॉग"च्या व्याख्येची सुरुवात होत असली तरी फक्त रोजनिशी ह्या कार्यापुरती मर्यादित न राहाता यावर बऱ्याच प्रकारचे लिखाण केले जाऊ शकते. वाटल्यास फक्त स्वयंपाकाच्या पाककृती प्रसिद्ध करा, प्रवासवर्णन लिहा, कविता प्रसिद्ध करा, फक्त गोष्टी लिहा किंवा कुठल्या गोष्टीवर आपले व्यक्तिगत विचार लिहा - ब्लॉग माध्यम आणि त्याचे वाचक तयार आहेत!
आणि आपले विचार व्यक्त करण्याची ही संधी पालघर मित्र तर्फ़े http://palgharmitra.blogspot.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देत आहोत.धन्यवाद!